मेष : ग्रहांची अनुकूलता वाढत जाईल तेव्हा कृतीवर भर जास्त राहील. व्यवसायात चांगली घटना व चांगली बातमी कळेल. मंगळ तुम्हाला कार्यक्षम ठेवले तरी ओळखीचा लाभ होईल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. नवीन कामांमुळे दगदग धावपळ वाटेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. घरात प्रियजनांचे बाबत झालेले गैरसमज दूर होतील. मुलांच्याबाबत समाधानकारक राहाल.
वृषभ : पैशाचे सोंग घेता येत नाहीत हे लक्षात ठेवून कृती करा. मनावर संयम ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्या. व्यवसायात भविष्यात लाभदायक ठरणारी कामे हाती घ्याल. हितचिंतकांची मदत कामात होईल. नवीन करारमदार होतील. उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारीमुळे सुविधा मिळतील. पगारवाढ, बढतीची शक्यता घरात नवीन खरेदीचा आनंद मिळेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. प्रकृतीची चिंता मिटेल.
मिथुन : केलेल्या कामाचे चीज होईल त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. भावनेच्या भरात वाहून न जाता व्यवहार सांभाळा. व्यवसायात अपेक्षित व अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. पैशाची सोय होईल. नवीन कामे मिळतील. त्यामुळे दगदग धावपळ वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची महती कळेल. मानसन्मानाचे योग. कौतुकास्पद काम हातून घडेल. घरात चांगली बातमी मन प्रसन्न ठेवेल. सर्वांच्या सलोख्याचे संबंध ठेवा.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल तेव्हा वेळीच आळा घाला. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून कामांना प्राधान्य द्या. महत्त्वाची कामे स्वत: व इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या. व्यवहार व मैत्री यांची गल्लत करू नका. नोकरीत बढाया न मारता हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करा. कुवत ओळखून कामे करा. पैशाच्या मोहापायी कुसंगत धरू नका. घरात “शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवून गैरसमजुतीने होणारे वाद टाळा.
सिंह : मनोबल उत्तम राहील. त्याचे जोरावर नवीन काहीतरी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी येतील. कामात व पैशाच्या बाबतीत बरकत राहील. आर्थिक ऊब मिळाल्याने कामात नवीन बदल करावेसे वाटतील; परंतु करण्यापूर्वी जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. नोकरीत जादा भत्ते व लाभ होतील. कामाचा उत्साह वाढेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात किरकोळ वादविवादाची शक्यता.
कन्या : बराच काळ मनात असलेली सुप्त इच्छा प्रत्यक्षात साकार झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात आवक- जावक समान राहील. तरीही कामाचे समाधान मिळेल. कार्यपद्धतीत बदल घडवून उलाढाल वाढवण्यात यश मिळेल. नोकरीत अधिकाराची कक्षा ओलांडू नका. अपेक्षित ठिकाणी बदल किंवा बदली होईल. घरात कर्तव्याला प्राधान्य द्याल. तडजोडीने प्रश्नांची उकल करा. तरुणांचे बाबतीत अनुकूल ग्रहमान राहील.
तुळ : सुसंधी मिळेल त्याचा लाभ घ्या. व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठाल. कामे मिळतील त्यात बदल करून उलाढाल व फायदा मिळवाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्व आघाड्यांवर सतर्क राहा. नोकरीत कामाचा तणाव कमी होईल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. घरात वागण्याबोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यक्तिगत जीवनात आनंदाचे क्षण उपभोगाल. प्रकृतीमान सुधारेल.
वृश्चिक : तुमची जिद्द व चिकाटी तुम्हाला कामात यश मिळवून देताना उपयोगी पडेल. अशक्यप्राय कामात यश मिळवून देताना उपयोगी पडेल. अशक्यप्राय कामात यश मिळवून कौतुकास पात्र ठराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी कामे मिळतील. जुने प्रश्न धसास लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून केलेली कामे लाभ देतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकून राहिल्याने आचारविचारात बदल शक्य होईल. घरात इतरांची साथं मिळेल.
धनु : तुमच्या हरहुन्नरी स्वभावात ग्रहांची साथ लाभेल. व्यवसायात काही कारणाने लांबलेली कामे मिळतील. नवी उमेद व हुरूप कामात वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कधी युक्तीने तर कधी शक्तीने कामात यश मिळवाल. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे पूर्ण कराल. कामात बदल करण्याचा विचार असेल तर प्रयत्न करा. घरात प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मुलांकडून सुवार्ता कळेल. मनोकामना पूर्ण झाल्याने मानसिक समाधान लाभेल.
मकर : भविष्याची तरतूद म्हणून घरातच नवीन काहीतरी करण्याचा विचार असेल. त्यात सफलता मिळेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. हितचिंतकांची कामात मदत होईल. जुनी येणी वसूल झाल्याने चार पैसे हातात राहतील. नवीन ओळखी होतील. नोकरीत कंटाळवाणे काम लपवून आवडीचे काम मिळेल. वरिष्ठांची भिस्त तुमच्यावर राहील. जास्त विचार न करता काम करीत राहणे चांगले. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल ते मोठ्या मुश्किलीने नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न राहील.
कुंभ : आळस झटकून काम करण्याचा चंग बांधाल. कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती करून वेळेत कामे पूर्ण करण्याचा मानस राहील. व्यवसायात गरजेनुसार कामात बदल करून फायद्याचे व उलाढाल वाढवण्याचे प्रयत्न राहतील. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा विशेष प्रयत्न राहील. नोकरीत तुमचे मूड इतरांना सांभाळावे लागतील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आपले काम बरे की आपण बरे हे धोरण ठेवा. घरात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
मीन : ग्रहांची अनुकूलता राहील. त्यामुळे महत्त्वाच्या कामांना चालना मिळेल. अपेक्षित सहकार्य मिळाल्याने व्यवसायात प्रगती होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुमचे मनोधैर्य उंचावेल. आर्थिकदृष्ट्या न परवडणारे बेत हातात घ्यावे लागतील. त्यासाठी कर्जेही मंजूर होतील लाभ घ्या. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याची दक्षता घ्या. कामात बिनचून राहून कामे वेळेत पूर्ण करा. जोडधंद्यातून फायदा होईल. घरात नेहमीपेक्षा वेगळे काम करण्याचा आनंद मिळेल.