उत्तर प्रदेशात कटेहारी, सीसामऊ, करहल, खैर, मंझवा, ङ्गुलपूर, गाझियाबाद शहर, मीरापूर आणि कुंदरकी या नऊ जागांवर पोटनिवडणुक होत आहे. युपीतील पोटनिवडणूक ही सप-काँग्रेस आघाडी आणि भाजपसाठी आरपारची लढाई मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत सप-काँग्रेस आघाडीने भाजप आघाडीला दणका दिला. सपने 37 जागा आणि काँग्रेसने सहा जागा जिंकून भाजपचे एकट्याने बहुमत गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. उत्तर प्रदेश हे राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचे राज्य मानले जाते. यासाठी सर्वच पक्ष राज्यावरची आपली पकड ढिली होणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशातील नऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशात 13 नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत सप-काँग्रेस आघाडीला यश मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीला राजकीय दृष्टीकोनातून महत्त्व आले आहे.
एकंदरीत या पोटनिवडणुकीचे निकाल समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी राजकीय वजन प्रस्थापित करणारे राहिल. लोकसभा निवडणुकीत भाजपला झटका बसल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्व शक्तीनिशी पोटनिवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे अखिलेश यादव यांनी पुन्हा पक्षाची ताकद दाखवत लोकसभेतील यश हे निर्भेळ होते हे सिद्ध करायचे आहे.
सप-काँग्रेसमधील जागावाटप
निवडणुकीच्या तारखांंची घोषणा झाल्यानंतरही आतापर्यंत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून जागावाटप झाले नाही. जागा वाटप करण्यापूर्वीच समाजवादी पक्षाने सहा जागांवर उमेदवार जाहीर केले. काँग्रेसकडून पाच जागांची मागणी केली जात असताना अखिलेश यादव यांनी मात्र तेवढ्या जागा देण्यास तयारी दर्शविली नाही. सपकडून काँग्रेसला दोन जागा देण्याचाच मुद्दा मांडला जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या चर्चेतूनच जागावाटपाचा पेच सुटू शकतो. सपकडून महाराष्ट्रात दहा जागा मागितल्याने हे प्रकरण आणखीच चिघळले आहे.
योगींसाठी विजय आवश्यक
लोकसभा निवडणुकीत ङ्गटका बसल्यानंतर यूपी पोटनिवडणूक ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवून योगी पुन्हा एकदा राज्यात आपले शक्तीप्रदर्शन घडवू इच्छित आहे. त्यामुळे त्यांनी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच सर्वच क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील दौरा पुर्ण केला. अलिकडेच योगी यांनी या भागात पाच हजार कोटीपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले.
योगींकडून पोटनिवडणुकीला महत्त्व देण्याचे आणखी एक कारण म्हणजे या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला नाही तर त्यांच्या नेतृत्वावरून प्रश्न होतील आणि ही बाब योगींना चांगलीच ठाऊक आहे. लोकसभेत जोरात ङ्गटका बसल्यानंतर नेतृत्वावरून प्रश्न उपस्थित केले गेले होते, परंतु शेवटी ते खुर्ची टिकवण्यात यशस्वी ठरले. आता विधानसभा पोटनिवडणुकीत योगींनी आपले बळ दाखविले नाही तर निश्चितच त्यांच्यासमोरील राजकीय अडचणी वाढू शकतात.
तीस मंत्र्यांना लावले कामाला
भाजपची रणनिती ही सर्व जागा जिंकण्याबरोबरच विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करण्याचा देखील आहे. या जागांसाठी योगी सरकारमधील तीस मंत्र्यांना कामाला लावले आहे. यात 14 कॅबिनेट आणि 16 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अखिलेश यादव यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या मैनपुरीतील करहल जागेवर चार मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे. नऊंपैकी आठ मतदारसंघातील विद्यमान आमदार हे खासदार झाल्याने या जागा रिक्त झाल्या आणि त्याचेवळी एक जागा सपचे आमदार इरङ्गान सोळंकीला शिक्षश मिळाल्याने रिक्त झाली. अर्थात लोकसभा निवडणुकीत 37 जागा जिंकल्यानंतर सपचे बळ चांगलेच वाढले आहे. म्हणूनच सपने सहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली तर भाजपकडून अद्याप उमेदवार घोषित झालेले नाहीत. उत्तर प्रदेशातील जातीचे एकगठ्ठा मतदान ङ्गोडणे देखील सत्ताधारी पक्षाला आव्हानात्मक आहे. ज्या नऊ जागांवर पोटनिवडणुक होत आहे त्यापैकी भाजप आणि घटक पक्षांकडे पाच जागा आहेत.
अखिलेश यांचा ‘पीडीए’वर विश्वास
दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव देखील 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पुन्हा आपली राजकीय शक्ती दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे निर्माण झालेला उत्साह हा कमी होणार नाही, याची काळजी ‘सप’चे कार्यकर्ते घेत आहेत. ‘सप’ने सहा उमेदवार जाहीर केले असले तरी काँग्रेसकडून जागा वाटपाचा ङ्गॉर्म्युला निश्चित झाल्यानंतरच अखिलेश यांचा प्रचार सुरू होईल, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. अखिलेश यादव हे ‘पीडीए’ ङ्गॉर्म्युलावर अवलंबून आहेत. हा ङ्गॉर्म्युला लोकसभेत हिट ठरला आणि त्यामुळेच पोटनिवडणुकीत हाच प्रयोग केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीती विजय हा एखाद्या लाटेमुळे मिळाला नाही, हे अखिलेश यांना सिद्ध करायचे आहे. त्यामुळे योगी अदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यापैकी कोण राजकीय शक्ती दाखविण्यात, राजकीय उंची गाठण्यात तसेच गड शाबूत राखण्यात यशस्वी होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
भाजपला आव्हान
उत्तर प्रदेशात कटेहारी, सीसामऊ, करहल, खैर, मंझवा, ङ्गुलपूर, गाझियाबाद शहर, मीरापूर आणि कुंदरकी या नऊ जागांवर पोटनिवडणुक होत आहे. मिल्कीपूर मतदारसंघाचे प्रकरण अजूनही कोर्टात असून तेथील तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तज्ज्ञांच्या मते, मुझफ्ङ्गरनगरचा मीरापूर मतदारसंघ राष्ट्रीय लोकदलाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नऊ जागांवर निवडणुक लढण्याचा निर्णय झाला होता. अर्थात निषाद पक्ष हा दोन जागांवर ठाम आहे. घटक पक्षांचे समाधान करत त्यांना सोबत घेण्याचे आव्हान योगींवर असणारच आहे. शिवाय यादव कुटुंबाचे प्राबल्य असलेली करहलची जागा, मुस्लिमबहुल कुंदरकी मतदारसंघ आणि कानपूरची सीसामऊ मतदारसंघात भाजपला ‘सप’कडून मोठे आव्हान मिळणार आहे.
पकड मजबूत करण्याचा प्रयत्न
युपीतील पोटनिवडणूक ही सप-काँग्रेस आघाडी आणि भाजपसाठी आरपारची लढाई मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत सप-काँग्रेस आघाडीने भाजप आघाडीला दणका दिला. सपने 37 जागा आणि काँग्रेसने सहा जागा जिंकून भाजपचे एकट्याने बहुमत गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. उत्तर प्रदेश हे राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचे राज्य मानले जाते. यासाठी सर्वच पक्ष राज्यावरची आपली पकड ढिली होणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहेत.
– अमित शुक्ल