Dainik Prabhat
Monday, March 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रूपगंध : नक्की काय आहे जोशीमठ समस्या ?

by प्रभात वृत्तसेवा
February 5, 2023 | 9:19 am
A A
रूपगंध :  नक्की काय आहे जोशीमठ समस्या ?

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकारी आणि सदस्यांची बैठक घेतली. एनडीएमएच्या सदस्यांनी भूस्खलन क्षेत्रात पाणी कोठे वाहत आहे आणि भूस्खलनाची कारणे कोणती आहेत याचे संशोधन करणे आवश्‍यक असल्याचे सुचवले. आता भूस्खलन म्हणजे काय? ते कसे घडते? ते कसे मोजले जाते? ही समस्या फक्‍त जोशीमठाचीच आहे का? वाचूया…

जोशीमठ हे सुमारे 500 मीटर उंच ढिगाऱ्याच्या डोंगरावर वसलेले गाव आहे. हे ढिगारे भूतकाळात झालेल्या भूस्खलनाचे आहेत. येथील जमीन पोकळ आहे. त्याचा पृष्ठभाग घन नाही. म्हणजे जमिनीखालील पृष्ठभाग पोकळ आहे. जेव्हा जेव्हा जमीन सरकते किंवा त्याखाली हालचाल होते, तेव्हा भेगा पडू लागतात. जोशीमठची भूमी स्थानिक लोकसंख्या आणि पर्यटकांची संख्या वाढण्यास सक्षम नाही. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनसाठी (एनटीपीसी) खोदण्यात आलेल्या बोगद्यांमुळे जोशीमठ खरोखरच बुडत आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ज्ञांकडून सुरू आहे.

जोशीमठ हे भारतातील सर्वात मोठं भूकंपप्रवण क्षेत्र असून ते 5व्या झोन मध्ये येतं. वर्ष 2011 च्या जनगणना आकडेवारीनुसार या भागात जवळपास 4 हजार घर होती आणि तेथे 17 हजार लोक राहत होते. पण जसजसा काळ पुढं सरकतोय तसतसं इथली मानवी वस्ती वाढतच चालली आहे.

महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी दक्षिण गुजरातपासून केरळ-तामिळनाडूपर्यंतच्या सह्याद्री पर्वतरांगेत जसा जांभा खडक किंवा बेसॉल्ट रॉक आढळतो, तसा खडक हिमालयीन पर्वतरांगेमध्ये नाही. बेसॉल्ट रॉक इतका टणक असतो की अनेकदा ड्रीलिंग करणारे इंडस्ट्रीयल ड्रील्सही तुटून जातात. मात्र, उत्तरेकडे तसे नाही. तिथला डोंगर प्रदेश मुरुमासारख्या ठिसूळ दगडांचा आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, जमीन खचणे असे प्रकार या भागात नित्य घडताना दिसतात.

विशिष्ट प्रकारच्या खडकांमधून भूजल मोठ्या प्रमाणात काढले जाते तेव्हा भूस्खलन होत असते. पाणी काढले की खडक आपोआप रिकामे होतात. पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल आणि रिझॉर्टसच्या बांधकामासाठी झालेली लक्षणीय जंगलतोडही या समस्येच्या मुळाशी असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. रस्ता रुंदीकरण, बोगदे काढणे आणि अन्य विकासकामे यामुळेही जमिनीची प्रतवारी बिघडते. आधीच ठिसूळ असलेला खडक अशा कामांमुळे अधिकच विसविशीत होत जातो, हे वास्तव आहे.

भूस्खलन म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हळूहळू किंवा अचानक कमी होणे. नैसर्गिक आणि मानवी दोन्ही कारणांमुळे भूस्खलन होऊ शकते. अमेरिकेच्या राष्ट्रीय समुद्री विज्ञान आणि वातावरणीय शास्त्र विभागाच्या मते, भूस्खलन अनेकदा पाणी, तेल, नैसर्गिक वायू किंवा खनिज स्रोतांचे पंपिंग, फ्रॅकिंग किंवा ब्लास्टींगमुळे होतात.

भूकंप, मातीचा दाब, हिमनगांच्या वजनाखाली जमीन सरकणे, सूर्यप्रकाश, जमिनीचा दाब तयार होणे आणि वाऱ्यांमुळे निर्माण होणारे सूक्ष्म भूजल नष्ट होणे यासारख्या नैसर्गिक घटनांमुळेच भूस्खलन होऊ शकते. हे संपूर्ण राज्ये किंवा प्रांतांसारख्या खूप मोठ्या भागात किंवा घरामागील अंगणासारख्या अगदी लहान भागातही होऊ शकते.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया, टेक्‍सास आणि फ्लोरिडा या राज्यांना यामुळे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे. ती एक जागतिक समस्या आहे. अमेरिकेतील 45 राज्यांमध्ये 17 हजार चौरस मीटर एवढ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूगर्भातील पाण्याच्या शोषणामुळे अमेरिकेतील 80 टक्‍क्‍यांहून अधिक जमिनीचा स्तर बदलला आहे. जमीन आणि जलस्रोतांच्या वाढत्या शोषणामुळे हा धोका वाढू शकतो. मेक्‍सिको सिटीमधील बॅसिलिकाच्या खालच्या भागात एक दगड सापडला आहे. टंचाईची हीच घटना संपूर्ण मेक्‍सिको सिटीमध्ये घडत आहे. यामध्ये वसाहती काळातील इमारतींचे नुकसान झाले आहे. महामार्ग ठप्प झाले असून पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था बिघडली आहे. काही इमारती असुरक्षित समजल्या गेल्या आहेत आणि त्या बंद करण्यात आल्या आहेत आणि इतर अनेक सुरक्षित राहण्यासाठी दुरुस्तीची आवश्‍यकता आहे.

अगदी अशाच घटना जोशीमठच्या परिसरात घडल्या आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी पाण्याचा बेसुमार उपसा जमिनीतून सुरू करण्यात आला. त्यामुळेही डोंगरकडे ढासळण्याच्या स्थितीमध्ये आले. तसेच खाण उद्योगामुळे तर डोंगर हळूहळू नाहीसेच व्हायला लागले. खनिजांसाठी उत्खनन करताना वापरण्यात येणारी स्फोटके जमिनीच्या किती खोलवर भेगा पाडू शकतात. हे बघायचे असेल तर जोशीमठला अवश्‍य भेट द्यावी.

जमिनीची झीज बहुतेकदा मानवी हस्तक्षेपांमुळे होते, मुख्यत्वे भूपृष्ठावरील पाणी काढून टाकल्यामुळे. अनेकदा सिमेंटचे रस्ते करण्याच्या नादात आपण जमिनीवर पडणारे पाणी जमिनीत मुरू देत नाही. त्यामुळे उंचच उंच असलेल्या झाडांची मुळे खिळखिळी होतात आणि वादळी पावसात कोसळतात.
भूस्खलन कसे मोजले जातात?

भूस्खलनामुळे होणारे बदल मोजण्याची एक पद्धत म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. अमेरिकेत राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनाचे नॅशनल जिओडेटिक सर्वेक्षण जीपीएस रिसीव्हर्सचे राष्ट्रीय नेटवर्क राखते. त्यांना कंटिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन्स म्हणतात. याचा उपयोग स्टेशनवरील उंचीमधील बदल शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. विविध प्रकारचे उपग्रह फ्लोटिंग जीपीएस रिसीव्हर्स वापरून, जिओडेटिक लेव्हलिंगचे सतत सर्वेक्षण करून किंवा जमिनीवर आणि पाण्यात सेन्सर ठेवून मोजले जाऊ शकतात. यामुळे जमिनीच्या पोटात सुरू असलेल्या हालचालींचा अंदाज येऊ शकतो. भारताकडे अलीकडच्या काळात ही प्रणाली विकसित झाली आहे. त्यामुळे आपल्याला हा डेटा आगाऊ मिळू शकतो. मात्र, नेहमी सरकारी पातळीवर होत असलेल्या डेटा मॅनेजमेंटमधल्या ढिसाळ कारभारामुळेही ही माहिती कार्यालयातच पडून राहिल्याच्या घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत.

त्यामुळे जोशीमठसारख्या समस्या टाळायच्या असतील तर सर्वप्रथम विकासाच्या व्याख्याच बदलाव्या लागतील. अन्यथा पश्‍चिम घाटातही या समस्या निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. माळीण आपण विसरलेलो नाहीये ना!

– श्रीनिवास वारुंजीकर

Tags: rupgandhWhat exactly is the Joshimath problem?

शिफारस केलेल्या बातम्या

रूपगंध :  क्रिकेटमधील खुन्नसच संपेल
रूपगंध

रूपगंध : क्रिकेटमधील खुन्नसच संपेल

13 hours ago
रूपगंध : पुढील वाटचाल अवघड ?
रूपगंध

रूपगंध : पुढील वाटचाल अवघड ?

15 hours ago
रूपगंध : गुगलआजी
रूपगंध

रूपगंध : गुगलआजी

17 hours ago
रूपगंध : महिला आरक्षणाचे कवित्व
रूपगंध

रूपगंध : महिला आरक्षणाचे कवित्व

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेसच्या सत्याग्रहाने गांधीजींचा अवमान – भाजप

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, राजकीय चर्चेला उधाण

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Most Popular Today

Tags: rupgandhWhat exactly is the Joshimath problem?

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!