Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रूपगंध : राहुल गांधी आणि थंडी

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 7:48 am
A A
रूपगंध : राहुल गांधी आणि थंडी

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते जम्मू काश्‍मीर पदयात्रा सुरू असून ही पदयात्रा सध्या हरियाणा, पंजाबमार्गे काश्‍मिरात पोहचत आहेत. आजघडीला उत्तर भारतात आणि काश्‍मिरात तापमानाने नीचांकी पातळी गाठलेली असताना ठिकठिकाणी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी पडलेली असताना आणि साध्या कपड्यावर घराबाहेर पडणे अशक्‍य असताना राहुल गांधी हे केवळ टी-शर्ट आणि ट्राऊजरवर कसे चालत आहेत? राहुल गांधी यांची ठेवण जगातील अन्य व्यक्‍तींपेक्षा वेगळी आहे का? त्यांच्यात असे काय वैशिष्ट्ये आहे की, ते एवढ्या कडाक्‍याच्या थंडीत उत्साहाने पायी चालत आहेत.

संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आहे. अनेक भागात दिवसभराच्या किमान तापमानाने विक्रम मोडला आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस राहात आहे. शहरात ठिकठिकाणी शेकोट्या दिसत आहेत. हवामान खात्याकडून येत्या काही दिवसांत कडाक्‍याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, यातही एक चमत्काराची गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे हाफ टी-शर्ट आणि पॅंटवर भारत जोडो यात्रा करत आहेत. एवढ्या थंडीतही राहुल गांधी यांची वाटचाल कुतुहलाचा विषय ठरत आहे. यावर माध्यमांत आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ही यात्रा पंजाबमध्ये असून लोहडी उत्सवामुळे काही काळ विश्रांती देण्यात आली आहे.

त्याचवेळी हरियाणात पदयात्रेत सहभागी होणारे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल आर. के. हुड्डा, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. के. नरुला, सेवानिवृत्त एअर मार्शल पी. एस. भंगू, सेवानिवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह चौधरी यांच्यासह पाच ते सहा अन्य सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी यांनी मात्र उबदार कपड्यांचा पेहराव केला होता. एकप्रकारे ही बाब आश्‍चर्यकारकच म्हणावी लागेल. कारण, उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी पडलेली असताना आणि साध्या कपड्यावर घराबाहेर पडणे अशक्‍य असताना राहुल गांधी हे केवळ टी-शर्ट आणि ट्राऊजरवर कसे चालत आहेत?

विशेष म्हणजे राहुल गांधी हे विशिष्ट प्रकारचे स्वेटर किंवा पुलओव्हरचा पेहराव करत नाहीत. त्यांचे हात नेहमीच पूर्णपणे उघडे असतात. डोक्‍याला कोणतीही टोपी, मफलर किंवा हॅट नाही. ते कानही झाकत नाहीत. मग प्रश्‍न असा पडतो की, हा काय चमत्कार आहे? राहुल गांधी यांची ठेवण जगातील अन्य व्यक्‍तींपेक्षा वेगळी आहे का? त्यांच्यात असे काय वैशिष्ट्ये आहे की, ते एवढ्या कडाक्‍याच्या थंडीत उत्साहाने पायी चालत आहेत आणि थंडीचा कोणताही लवलेश चेहऱ्यावर दिसत नाही. लोकांच्या मनात असे अनेक प्रकारचे प्रश्‍न उपस्थित होत आहेत, तर्कवितर्क लावले जात आहेत.

कारण मेडिकल सायन्सच्या मते, किमान तापमान हे चार अंशापेक्षा खाली जात असेल तर ही स्थिती शरीरासाठी खूपच धोकादायक ठरू शकते. कारण सामान्यपणे या स्थितीत सर्वांनाच थंडी वाजते. अर्थात काही जणांना खूपच हुडहुडी भरते तर काहींना थोडी कमी थंडी वाजते. मात्र चार अंशापेक्षा कमी तापमान असेल तर सर्वांनाच हुडहुडी भरणे अपेक्षित आहे. मात्र एखाद्याला थंडी वाजत नसेल तर त्या व्यक्‍तीच्या कौशल्याचे कौतुक करायला पाहिजे किंवा अनुवांशिक रुपाने ती व्यक्‍ती थंडी सहन करणाऱ्या प्रवृत्तीची आहे का? त्याला काही शारीरिक समस्या आहे का? अशी व्यक्‍ती थॉयराइड हार्मोनच्या हायपरथायराडिज्म पीडित असू शकते का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

चार अंशांपेक्षा तापमान खाली घसरणे ही शरीराची भंबेरी उडवणारी थंडी आहे. म्हणजे 6 जानेवारी 2023 रोजी किमान तापमान 4 अंशापेक्षा खाली गेले तेव्हा कानपूरच्या दोन सरकारी रुग्णालयात चोवीस तासांच्या आत 25 जणांना हृदयविकाराचा झटका आला किंवा कडाक्‍याच्या थंडीने ब्रेनस्ट्रोकने मृत्यू झाला. अशा जीवघेण्या कडाक्‍याच्या वातावरणात राहुल गांधी हे कोणतेही उबदार कपडे न घालता पदयात्रा करत असेल तर त्यांना नक्‍कीच दैवी शक्‍ती प्रदान असेल, असेही म्हणावे लागेल. मात्र, विज्ञान कोणत्याही चमत्कारावर विश्‍वास नाही ठेवत. काही जण राहुल गांधी हे थॉयराइड हार्मोनच्या असंतुलनाचा सामना तर करत नाहीत ना? अशी शंका व्यक्‍त करू शकतात. असे प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अर्थात, हे केवळ तर्कवितर्क आहेत. कारण, कॉंग्रेस पक्ष किंवा राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने शारीरिक तंदुरुस्तीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत. ते अतिशय फीट आहेत, असे सांगितले गेले आहे.

जॉर्ज वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीन अँड हेल्थ सायन्सच्या मानसोपचार विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. ऋषी गौतम याना पत्रकारांनी राहुल गांधी यांना थंडी का वाजत नसावी, अशी विचारणा केली. त्यांच्या मते, आपल्या शरीरातील तांत्रिकतंत्रामध्ये असलेले उष्ण आणि थंड रिसेप्टर्सच्या माध्यमातून शरीराला तापमानाचा अनुभव येत असतो. थंडीचा अनुभव घेताना स्नायूचे प्रकार, चरबीची स्थिती आणि शारीरिक आरोग्य कंडीशनिंगचा खूप परिणाम होतो. या बाबी आपल्याला थंडी वाजेल की नाही हे निश्‍चित करत असतात. याचाच अर्थ असा की थंडीची अवस्था ही शरीराच्या स्थितीवर अवलंबून असते.

म्हणजे काही जणांना थंडी कमी वाजणे किंवा खूपच कमी वाजणे हे वास्तवातही खरेच असते. म्हणून राहुल गांधी यांची कडाक्‍याच्या थंडीत सुरू असलेली पदयात्रा ही एखाद्या चमत्काराप्रमाणे वाटत आहे. यामागे कोणालाच माहीत नसलेले एखादे गुपित असू शकते का? राहुल गांधी यांच्यात शारीरिक असंतुलन असेल तर हायपर थॉयराडिज्मचा त्रास त्यांना आहे की नाही, हे तपासले पाहिजे. कारण अशा मंडळींना कडाक्‍याच्या थंडीतही उकडत असते आणि घामही येतो. अशा लोकांचे वजन देखील कमी होते व हृदयाचे ठोकेही वाढतात. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे राहुल गांधी यांच्यात दिसत नाहीत.

– कमलेश गिरी

Tags: Rahul Gandhi and Thandirupgandh

शिफारस केलेल्या बातम्या

रूपगंध : प्रश्‍न चुकीच्या माहितीचा…
रूपगंध

रूपगंध : प्रश्‍न चुकीच्या माहितीचा…

2 days ago
रूपगंध : पेटारा अर्थमंत्र्यांचा डोंगर आव्हानांचा
रूपगंध

रूपगंध : पेटारा अर्थमंत्र्यांचा डोंगर आव्हानांचा

2 days ago
रूपगंध : संघ निवडीचे निकष काय?
रूपगंध

रूपगंध : संघ निवडीचे निकष काय?

2 days ago
रूपगंध :  ऐकुया जरा
रूपगंध

रूपगंध : ऐकुया जरा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: Rahul Gandhi and Thandirupgandh

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!