Dainik Prabhat
Saturday, April 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रूपगंध : घरभर दरवळणारा सुगंध

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 8:03 am
A A
रूपगंध : घरभर दरवळणारा सुगंध

घुनाथराव आपल्या कुटुंबासोबत टॅक्‍सीने घरी जायला निघाले होते. घराजवळ आले, पण वाटेत भरपूर ट्रॅफिक. नेमका मोठा सिग्नल लागला. टॅक्‍सी थांबली. तशी एक मुलगी टॅक्‍सीच्या खिडकीत डोकावत रघुनाथरावांना आर्जवाने म्हणाली, “साहेब, गजरे घ्या ना घरच्यांसाठी.’

टॅक्‍सीतील सर्वांचेच लक्ष त्या मुलीकडे गेले. साधारण क्रांतीच्याच वयाची ती मुलगी. अंगभर कुडता पायजमा. समोरून कमरेपर्यंत वेढून घेतलेली ओढणी आणि हातात गजऱ्यांची छोटी टोपली. रघुनाथरावांनी त्या मुलीला विचारले, “काय गं, काय नाव तुझे? शाळेत जातेस का?’
“साहेब, माझं नाव पुष्पा. जात होते मी शाळेत. पण आता नाही जात. मध्येच सुटली हो माझी शाळा.’
“का गं? कशी काय?’ रघुनाथरावांच्या पत्नीने सहजपणे विचारले.

“काय झालं, गेल्या वर्षी नववी पास होऊन मी दहावीत गेले आणि माझे वडील वारले. त्यात आईचा दमाही वाढला. मग माझी शाळा पडली मागे आणि घराची जबाबदारी आली पुढे. घरी लहान भाऊ असतो. आता आई बसल्या बसल्या गजरे वळून देते आणि मी ते नाक्‍यावर, सिग्नलवर विकते. घ्या ना साहेब गजरे. स्वस्त आहेत. दहा रुपयाला एक. पण पन्नास रुपयांना सहा देईन. एक जास्त.’
“सगळे गजरे मोज बघू किती आहेत ते आणि सांग मला पटकन, किती पैसे होतील त्याचे. लवकर सांग हा. सिग्नल जाईल.’ मुलीने पटपट टोपलीतील सगळे गजरे मोजले. बोटावर चटचट हिशेब केला आणि घाईतच म्हणाली, “चारशे पन्नास रुपये होतील साहेब.’
रघुनाथरावांनी पटकन खिशातून पाचशेची नोट काढून त्या मुलीच्या हातावर ठेवली.

मुलगी आनंदाने म्हणाली, “देवच पावला. आज लवकर घरी जायला मिळेल.’ मुलीने मग पटकन ओढणीच्या टोकाला बांधून ठेवलेल्या पैशातून पन्नास रुपये काढून त्यांना परत केले. तसे रघुनाथराव म्हणाले, “राहू दे. ते पन्नास रुपये ठेव तुला. आमच्याकडून तुला बक्षीस.’ “नको नको साहेब. असे फुकटचे पैसे घरी नेले तर आई रागावेल. ती म्हणते, कोंड्याचा मांडा करून खायची पाळी आली तरी चालेल. तो गोड मानून खाऊ. कारण त्याला कष्टाची चव असेल. पण फुकटची पुरणपोळीसुद्धा आमच्या घरी गोड लागणार नाही.’

त्या मुलीचं बोलणं. तिचा स्वभाव आणि तिचा स्वाभिमान पाहून रघुनाथराव आणि त्यांची पत्नी सावित्री प्रभावित झाली. रघुनाथराव म्हणाले, “हे बघ पुष्पा, तू मध्येच शाळा थांबवू नकोस. तू बाहेरून दहावीच्या परीक्षेला बस. सतरा नंबरचा फॉर्म भर. हे माझं कार्ड घे. तू नक्‍की ये तुझ्या आईला घेऊन. मी तुझा दहावीचा परीक्षा फॉर्म भरण्याची व्यवस्था करतो.’ मुलीने कार्ड हातात घेतलं. तिचा चेहरा उजळला. तेवढ्यात सिग्नल सुटला. धावत्या टॅक्‍सीतून मागे वळून वळून क्रांती आणि प्रणव त्या मुलीकडे पाहत होते. त्यांनाही त्या मुलीचे खूप कौतुक वाटले.

घरी आल्यावर एवढ्या गजऱ्यांचे आता करायचे काय? हा सुरुवातीला साऱ्यांना पडलेला प्रश्‍न क्रांतीने चुटकीसरशी सोडवला. तिने आजी-आजोबांच्या फोटोला गजरेच माळले. देव्हाऱ्यालाही गजऱ्याचे तोरण तयार केले. देव्हाऱ्यातल्या देवांच्याही गळ्यात गजरे घातले. शेवटी दोन गजरे उरले. क्रांतीने एक गजरा दिला आईला आणि दुसरा ठेवला स्वतःला.
बाबा म्हणालेच,” क्रांती, तुझी गजऱ्याची आयडिया बाकी झ्यॅक हा!’

दिवसभर गजऱ्यांचा सुगंध घरभर दरवळत राहिला आणि पुष्पाचा चेहरा आणि तिचं लाघवी बोलणंही घरात सर्वांना आठवत राहिलं. या गोष्टीला चार पाच दिवस झाले असतील. तोच एका रविवारी संध्याकाळच्या वेळी दारावरची बेल वाजली. प्रणवने दार उघडले. तर दारात तीच, गजरेवाली मुलगी. तिच्या हातात एक कापडी पिशवी आणि तिच्यासोबत एक बाई होती. सोबत एक लहान मुलगा तिचे बोट धरून उभा होता.

प्रणव लगेच म्हणाला, “बाबा, ती गजरेवाली मुलगी आलीय.’ आई दारात आली. म्हणाली, अरे तिचं नाव पुष्पा आहे. या आत या.’
सगळे आत आले. पुष्पाने लगेच तिच्या आईची आणि तिच्या लहान भावाची ओळख करून दिली. तिची आई म्हणाली, “आमच्या पुष्पाला तुम्ही सिग्नलवर भेटलात आणि तिची शिक्षणाची इच्छा पुन्हा जागी झाली साहेब. तिनं शिकावं असं मला खूप वाटतंय. पण मार्गच सापडत नव्हता. घरी बसून बाहेरून परीक्षा द्यायची सोय हाय म्हटल्यावर जीव हरखला माझा. माझी पुष्पा गुणाची पोर हाय. घरी काम करून अभ्यासबी करंल आणि गजरं विकून चार पैसंबी मिळवंल. पण एक वर्ष मध्येच बुडालंय तिचं? चालंल नव्हं?,’ आईने काळजीनं विचारलं.
“होय होय, चालेल. काही काळजी करू नका.’

पुष्पाची आई उत्साहानं म्हणाली, “मग तर देवच पावला. मी पोरीला खूप शिकवंल. पण साहेब आता दहावीसाठी किती खर्च येईल म्हणायचा?’ “खर्चाची नका काळजी करू. माझ्या ओळखीची एक सामाजिक संस्था आहे. ती करेल मदत आणि आम्हीसुद्धा आहोतच की.’ पुष्पाच्या आईने सर्वांचे आभार मानले आणि आनंदाने ते घराबाहेर पडले. त्यांनी सोबत आणलेल्या गजऱ्यातील मोगऱ्याचा सुगंधही घरभर दरवळत राहिला.

एकनाथ आव्हाड

Tags: A scent that wafts through the houserupgandh

शिफारस केलेल्या बातम्या

रूपगंध :  क्रिकेटमधील खुन्नसच संपेल
रूपगंध

रूपगंध : क्रिकेटमधील खुन्नसच संपेल

6 days ago
रूपगंध : पुढील वाटचाल अवघड ?
रूपगंध

रूपगंध : पुढील वाटचाल अवघड ?

6 days ago
रूपगंध : गुगलआजी
रूपगंध

रूपगंध : गुगलआजी

6 days ago
रूपगंध : महिला आरक्षणाचे कवित्व
रूपगंध

रूपगंध : महिला आरक्षणाचे कवित्व

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज्यात 21 ते 28 मे दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ – पर्यटनमंत्री लोढा

TET Exam: निकालाची गुणपत्रके डाऊनलोड करण्यासाठी लिंक खुली

महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय! ‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही

#NZvSL ODI Series : तिसऱ्या सामन्यासह New Zealand चा मालिका विजय

पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 7वेळा खासदार राहिलेले संदीपान थोरात यांचे निधन

#IPL2023 #GTvCSK : ऋतुराजचे शतक हुकलं, गुजरातसमोर 179 धावांचे लक्ष्य..

मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा – राज्यपाल बैस

ICC ODI World Cup 2023 : “विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानचे…” ICC कडून सर्व अफवांना पूर्णविराम

माझी राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा नाही – नितीन गडकरी

PMC : बांधकाम विभागाचे उत्पन्नाचे इमले, सलग दुसऱ्या वर्षी …

Most Popular Today

Tags: A scent that wafts through the houserupgandh

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!