सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर
नगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रुपेश काळेवाघ यांची व नगर तालुका अध्यक्षपदी अमोल शिंदे यांची निवड आज जाहीर करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, नीलेश बांगरे, साधनाताई बोरुडे, नितीन जठार, संजय काळे, अभिजित उजागरे, विशाल सकट, नीलेश गायकवाड, बाबासाहेब शेंडगे, अजय शेंडगे, श्रीकांत शिंदे, विशाल शिंदे, अजय शिंदे, वैभव शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले,””राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून युवकांना समाजाच्या तळागाळातील प्रश्न सोडविण्यासाठी संधी देण्यात आली आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पक्षाची वाटचाल सुरु आहे. या भावनेनेच पदाधिकाऱ्यांनी काम करावे.”