ज्वारीचे उत्पादन घटल्याने भाकरीस महागाईची झळ

ओंकार दळवी
जामखेड – पावसाअभावी खरीप व रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. मुंबई, पुणे, नगर जिल्हात जामखेडची प्रसिद्ध असलेल्या ज्वारीचे यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटले. त्यामुळे ज्वारीचा भाव प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांवर पोहोचला.

पावसाअभावी जामखेड तालुक्‍यातील शिवारात पांढरी शुभ्र चवदार असलेल्या ज्वारीची पेरणीच झाली. नसल्यामुळे हजारो हेक्‍टरवरती उत्पादन घटले असून, दुभत्या जनावरास पोषक असणाऱ्या चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. जनावरे कवडीमोल किमतीत बाजारात विकली जात आहेत. जगावे कसे हा प्रश्‍न शेतकरीवर्गांना भेडसावत असून, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

तालुक्‍यात तालुक्‍यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या पाऊस पडला नसल्याने रब्बीतील ज्वारी, सूर्यफूल, हरभरा, करडा आदी धान्याची पेरणीच न झाल्याने उत्पादन शून्यावर येणार आहे. पावसाच्या अभावी शिवारातील हरभरा पिकाची पेरणी झाली नसल्यामुळे सकस अशी हिरवीगार भाजी दिसेनाशी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा ज्वारी, बाजरीच्या किमतीत दुपटीने, तर गहू दीडपटीने महागला आहे. अगोदरच शेतकरी, मजूर पाणीटंचाई, जनावरांचा चारा, आर्थिक समस्यांचा सामना करीत असताना, आता त्यांच्या ताटातली भाकरही महागली आहे. यामुळे आता जगायचं कसं, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. जामखेड तालुक्‍यासह आसपासच्या तालुक्‍यात पिकणाऱ्या ज्वारीमुळे जामखेड तालुका चांगला प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मुंबई, पुणे, नगर जिल्हात जामखेडची ज्वारीची मागणी असते. गेल्यावर्षी कमी पावसामुळे, दुष्काळामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनात घट झाली. पावसाअभावी अनेक भागात ज्वारीची पेरणीच होऊ शकली नाही. पेरणी झालेल्या भागात पावसाअभावी पीक वाढू शकले नाही. उत्पादन घटल्याने छोट्या शेतकऱ्यांनी ज्वारी कुटुंबासाठी राखून ठेवली. परिणामी बाजारात आवक घटली. त्यामुळे प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांवर पोहोचली आहे. किरकोळ विक्री दर तीन हजार, 300 रुपये झाला आहे. गतवर्षी हा दर एक हजार 800 ते दोन हजार रुपये होता. तसेच कडबा नसल्याने चाऱ्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. त्याचेही दर वाढल्यामुळे पशुपालक हैराण आहेत. आगामी काळात ज्वारीची पाऊले महागाईकडे सरकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)