मुंबई – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य शुक्रवारी 16 पैशांनी घसरून 82.33 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. आंतरबॅंक परकीय चलनात, रुपया ग्रीनबॅकच्या तुलनेत 82.19 वर उघडला, नंतर मागील बंद भावाच्या तुलनेत 16 पैशांची घसरण नोंदवून 82.33 वर आला.
कालच्या व्यवहारात रूपयाची घसरण तुलनेत खूप मोठी म्हणजे 55 पैसे इतकी होती. दरम्यान कच्चा तेलाचे दरही वाढत असून त्यातच रूपयाची किंमत कमी होत असल्याने चालू खात्यावरील तूट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
सध्या कच्चा तेलाचे दर 94.33 डॉलर्स प्रति बॅरल इतका झाला आहे. तथापि असे असले तरी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची पावले पुन्हा हळूहळू भारतीय शेअर बाजाराकडे वळत आहेत हे त्यातल्या त्यात बरे संकेत मानले जात आहेत. गुरूवारी या गुंतवणूकदारांनी 279.01 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.