मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या काही दिवसापासून वाढत आहेत. त्याचबरोबर जागतिक गुंतवणूकदारांकडून शेअरची खरेदी होऊ लागली आहे. यामुळे आयात आणि निर्यात करणाऱ्या कडून डॉलरची विक्री होत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यांमध्ये शुक्रवारी बरीच वाढ झाली.
शुक्रवारी रुपयाचा भाव 74.35 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. कालच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये 58 पैशांची वाढ झाली आहे. याबाबत बोलताना बीएनपी परिबा या संस्थेचे साहिल मुकादम यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर थोडासा कमकुवत झाल्यामुळे रुपयाला सध्या तरी आधार मिळाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून भारतीय रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत असल्याचे समजले जात आहे. दरम्यान गुरुवारच्या माहितीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 979 रुपये कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.