मुंबई – अमेरीकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर डॉलर वधारत असून त्याचा परिणाम भारतीय रुपयासह इतर चलनावर होत आहे. सोमवारी रुपयाचे मुल्य पुन्हा 2 पैशांनी कमी होऊन 84 रुपये 39 पैसे प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि घसरणार्या शेअर बाजार निर्देशांकाचाही रुपयाच्या मुल्यावर दबाव कामय आहे.
दरम्यान असे समजले जात आहे, की नव्या परिस्थितीत चीनच्या यॉनसह इतर चलनावर दाबाव वाढणार असल्यामुळे भारत नव्या परिस्थिीत रुपयाचे मुल्य काही प्रमाणात घसरु देणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक परकीय चलनसाठ्याचा वापर करुन रुपयाचे मुल्य विशिष्ट पातळीवर स्थिर करण्यात पुढाकर घेण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी रुपाचे मुलय 5 पैैशांनी कमी झाले होते. गेल्या चार सत्रात रुपयाचे मुल्य तब्बल 30 पैशांनी कमी झाले आहे. या आठड्यात भारत व अमेरीकेच्या किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर या देशांचे पुढील पतधोरण ठरणार आहे. त्याचा रुपयाच्या मुल्यावर परिणाम अपेक्षित आहे. त्याकडे चलन व्यापर्याचे लक्ष राहणार आहे. डॉलर वधारत असल्यामुळे आणि चीन सवलतींचा भडिमार करीत असल्यामुळे आक्टोबर महिन्यात परदेशी गुंतवणूकदारानी भारतीय शेअर बजारात 11 अब्ज डॉलरची तर नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 1.50 अब्ज डॉलरची विक्री केली आहे.
शुक्रवारी या गुंवणूकदारांनी 3,404 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. त्याचा शेअर बाजार निर्देशांकाबरोबरच रुपयाच्या मुल्यातर दबाव येत आहे. दरम्यान जगातील 6 प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर वधारत असल्यामुळे डॉलर इंडेक्स आता वाढून 105.50 अंकावर गेला आहे. म्हणजे रुपयासह इतर प्रमुख चलनांच्या मुुल्यावर दबाव आहे. अशा परिस्थितीत भारताकडील परकीय चलन साठ्यावर परिणाम होत असून त्याचा रुपयाच्या मुल्यावर दबाव वाढत आहे.
———