रुपयाची घसरण चालूच

मुंबई  – करोना रुग्ण वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आयात- निर्यात करणाऱ्यांकडून डॉलरची खरेदी चालू असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे.

शेअर बाजाराचे निर्देशांकही कमी होत आहेत. त्यामुळे रुपयाला आधार मिळत नसल्यामुळे रुपयाचा दर कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी रुपयाचा दर सात पैशांनी घसरून रुपयाचा भाव 75.01 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. काल परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी 909 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याचे आकडेवारी समोर आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.