रुपयाच्या मुल्यात सुधारणा

मुंबई : गेल्या पंधरवड्यात रुपयाचे मूल्य बरेच कमी झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने चलन बाजारात हस्तक्षेप केला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मंगळवारी रुपयाच्या मूल्यात 7 पैशाची सुधारणा होऊन रुपयाचा दर 74.66 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.

आज शेअर बाजारातही बरीच खरेदी होऊन निर्देशांक वाढल्यामुळे त्याचा रुपयाला आधार मिळाल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. जागतिक पातळीवर मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे चलन बाजारात थोडीशी स्थिरता निर्माण झाली होती.

मात्र भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत. हा आयातदार आणि निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय झालेला आहे. काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1360 कोटी रुपयांची विक्री केली असल्याचे दिसून आले.

डॉलर बळकट होत असल्यामुळे आणि भारतात करोनाची स्थिती बिघडत चालल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून अंग काढून घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.