Rupali Chakankar : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत असून अनेक ठिकाणी धक्कादायक घडामोडी पाहायला मिळत आहेत. बीडमधील मस्साजोग येथे दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातही एक मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. (Rupali Chakankar) दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.(Rupali Chakankar) या लढतीत विशाल नरेंद्र थोरात यांनी ३०४ मतांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले. त्यांच्या विजयामुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, संतोष बोराटे यांच्या पराभवामागे स्थानिक पातळीवरील नाराजी कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. (Rupali Chakankar) खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर काही काळ राजकीयदृष्ट्या शांत असलेल्या रुपाली चाकणकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. दीड महिन्यांच्या ब्रेकनंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदूर येथे कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. (Rupali Chakankar) या बैठकीचे फोटो स्वतः रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले असून “गोतावळ” असे कॅप्शन दिले आहे. मात्र, या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पडद्यामागे काय घडतंय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Rupali Chakankar) हेही वाचा : Rupali Chakankar : खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या अंगलट; SITकडून बजावले समन्स, चौकशी होणार