वाॅशिंग्टन – अमेरिकेच्या फिटनेस ट्रेनर रूपा हुलेट यांनी 1 मिनिटात 34 पुलअप्स काढून वर्ल्ड रेकाॅर्ड केला आहे. गिनिज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डेमध्ये याची नोंद झाली आहे. रुपा यांचा पुलअप्स काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अमेरिकेतील वेस्ट वर्जीनिया येथे राहणाऱ्या रूपा यांनी सांगितले की, लाॅकडाऊनमध्ये अनेक पुलअप्स केले. दरोरोज सराव करत असल्याने हळू-हळू स्पीड वाढत गेला. दिवसात 100 पुलअप्स होत होते. यामुळे फिटनेसमध्ये सुधारणा झाली तसेच स्टॅमिना वाढण्यासही मदत झाली.
त्यानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर कोणता वर्ल्ड रेकाॅर्ड केला जाऊ शकतो याची माहिती घेतली. एक मिनिटात पुलअप्स रेकाॅर्डबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पुलअप्सचा अधिक सराव करून त्यात वर्ल्ड रेकाॅर्ड केले, असे रूपा यांनी सांगितले आहे.
रूपा यांना फिटनेसबाबत फार आवड नव्हती, पण त्यांनी एका ट्रेनरकडून वर्कआउट ट्रेनिंग घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांचं वजन कमी झालं. मग त्यांची फिटनेसमध्ये आवड निर्माण झाली. वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी हा वर्ल्ड रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. या गोष्टीचा आपल्याला खूप आनंद होत आहे, असे रूपा यांनी सांगितले.