सासवड – बोपदेव घाट- कात्रज मार्गावर बोपदेव घाट संपल्यानंतर दोन ते अडीच किलोमीटर पुढे येवलेवाडी परिसरात सिटीबसच्या टायरमधुन अचानक धुर निघु लागला. सासवड वरुन कात्रजकडे येताना प्रवाशांना ८ च्या सुमारास येवलेवाडीत सोडण्यात आले. प्रवाशांची सकाळीच गैरसोय झाली असून, मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याबाबत सिटीबस आणि पी. एम. पी प्रशासनाच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.