धावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी

नवी दिल्ली – महाराष्ट्राची धावपटू संजीवनी जाधव हिच्यावर आंतररष्ट्रीय हौशी ऍथलेटिक्‍स महासंघाच्या खेळाडू आचारसंहिता समितीचे दोन वर्षांकरिता बंदी घातली आहे. उत्तेजक सेवनामध्ये ती दोषी आढळल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

बंदीच्या कारवाईमुळे जाधव हिला 29 जून 2018 या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेली सर्व पदके, पुरस्कार, रोख पारितोषिके याच्यावर तिला पाणी सोडावे लागणार आहे. जाधव या 23 वर्षीय खेळाडूने 2017 मध्ये झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील 5 हजार मीटर्स शर्यतीत ब्रॉंझपदक मिळविले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.