पुणे – भारताची अव्वल धावपटू कविता राऊत यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष अभिमन्यू सुर्यवंशी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत लवकर कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
कविता राऊत यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करताना विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचेही आश्वासन देण्यात आले होते.
त्यांची शैक्षणिक पात्रता बी.ए. आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्यांना शासकीय सेवेपासून वेळोवेळी डावलले गेले आहे.
शासकीय सेवेतील वर्ग-1 पदासाठी त्यांची नियुक्ती करावी. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.