पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडीतील अनेक संसार पाण्यात

पिंपळे गुरव  –दापोडी, फुगेवाडी, कासारवाडीतील पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार पाण्याखाली गेले होते. त्यांच्या मदतीसाठी स्थानिक नगरसेवकांसह अनेक संस्था, संघटना, मंडळ धावून आली आहेत. पवना नदीच्या पूराचा दापोडी, फुगेवाडी, कासारवाडीतील हजारो नागरिकांना फटका बसला आहे. पूर पातळी कमी झाली असली तरी संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. पूर आल्यानंतर या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेतली.

बोटीतून सुमारे 500 हून अधिक पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या जेवण, निवाऱ्याची सोय करुन दिली. थंडीपासून बचावासाठी गरम कपडे पुरविण्यात आले. त्यांना वैद्यकीय सेवा पुरविली. नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे तसेच सामाजिक कार्यकर्तें शेखर काटे, रवी कांबळे, माजी नगरसेवक संजय काटे, विशाल वाळुंजकर आदींनी अतोनात परिश्रम करुन पूरग्रस्त लोकांना जमेल तशी दिवस-रात्रं मदत करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.