पुणे – पुणे शहरात करोना विषाणूने बाधित झालेला पाहिला रुग्ण मिळाल्यापासून सोशल मीडियावर अनेक बातम्या, पोस्ट, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स, फोटो प्रसिध्द होत आहे. यामध्ये करोना विषाणूच्या संर्दभाने खोट्या बातम्या, अफवा पाठविल्या जात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणी मेसेज पुढे पाठवू नयेत किंवा तयार करु नयेत अन्यथा सायबर गुन्हे शाखेमार्फेत अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिला आहे.
फेसबुक, टिव्टर, इन्सटाग्राम, व्हॉटसअप अशा सोशल मीडियावर अधिकतर गोष्टी खोट्या आहेत. जसे की, करोना विषाणू पासून वाचण्याचे घरगुती, आयुर्वेदिक उपाय, करोना विषाणू बाधित लोकांची संख्या, त्यांची नावे, त्यांचे संर्पकात आलेल्यांची यादी, करोना विषाणूवर आधारित तज्ज्ञ व्यक्तींची मते, फोटो, ऑडिओ क्लिप्स, व्हिडीओ, सरकारने जाहीर केलेले लॉकडाऊन संबंधातील सूचना व कालावधी याबाबत चुकीची माहिती तसेच करोना विषाणू संर्दभात लोकांत भितीचे वातावरण निर्माण होईल, असे मेसेज प्रसारित करणे, अशा पध्दतीचे मेसेज आले असतील तर ते पुढे कोणाला पाठवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा भादंवि कलम 18, 5050 (2) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (1) (ब), 54 अन्वये कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.