कार्तिक आर्यनच्या चित्रपटापेक्षा त्याच्या लिंकअपच्या बातम्याच अधिक चर्चेत असतात. बॉलिवूडच्या दुनियेत कार्तिकचे पहिल्यांदा नाव दंगलची फातिमा सना शेखशी जोडले गेले होते. त्यानंतर नुसरत भरुचाशी त्याचे नाव जोडले गेले. तिच्यासमवेत त्याचे चार चित्रपट आहेत. त्यानंतर त्याचे नाव मॉडेल डिंपल शर्मा आणि बी-टाऊनची अभिनेत्री अनन्या पांडेशी देखील जोडले गेले.
गेल्या काही दिवसांपासून सारा अली खानशी देखील त्याचे लिंकअप असल्याची चर्चा होती. दोघांच्या वाढत्या जवळीकीमुळे अमृता सिंह नाराज असल्याचे बोलले जात होते. याबाबत अमृता सिंहने तिची झाडाझडती घेतल्याचेही वृत्त आहे. परंतु कार्तिकने कोणत्याच लिंकअपला मान्य केले नाही.
अलीकडेच कार्तिक आर्यनने ” पती,पत्नी और वो’ च्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी चर्चा करताना लिंकअपच्या बातम्या आणि पत्नीबाबत मत मांडले. तो म्हणाला, मी लिंकअपच्या अफवांसाठी यूज टू झालो आहे. जर माझ्याबाबत काही छापून आले नाही तर लोक अस्वस्थ राहतात. मी आनंदी असून कामात व्यग्र आहे. लिंकअपच्या बातम्यावरुन मी फारसा विचार करत नाही.