अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री खासदार किरण खेर यांच्या निधनाची अफवा आज जोरात पसरली होती. त्यामुळे अनुपम खेर यांनी सोशल मीडिया वरून त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
इन्स्टाग्रामवर दिलेल्या स्पष्टीकरणात किरण खेर सुस्थितीत असल्याचे अनुपम यांनी म्हटले आहे. किरण यांनी करोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. त्यामुळे आता लोकांनी निगेटिव्ह बातम्या पसरवू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आपली आई, भाऊ, वहिनी आणि पत्नी हे सर्व सुस्थितीत आहेत आणि त्यांनी नानावटी रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे, आहे, असे अनुपम खेर म्हणाले.
किरण खेर यांना कॅन्सर झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी स्वतः अनुपम यांनीच सांगितली होती. त्यानंतर बॉलीवूड सेलिब्रिटींनी किरण यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.