पुन्हा अफवा, धावपळ अन्‌ गर्दी

मगर दिसली, आम्ही नाही पाहिली...

पुणे – नदीपात्रात पुन्हा एकदा मगर दिसल्याची माहितीने भिडे पुलावर शनिवारी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती. बघ्यांमध्ये मात्र “खरंच मगर आहे का’, अशी चर्चा रंगली होती.

नदीपात्रात मगर दिसल्याची माहिती मागील आठवड्यात एका व्यक्तीने दिली होती. त्यानंतर या परिसरात प्रशासनाकडून शोध मोहीमदेखील राबवली. मात्र, जाळ्यात मगरीऐवजी कचराच सापडला. ही घटना ताजी असतानाच, शनिवारी या घटनेची पुनरावृत्ती झाली. नदीपात्रात मगर असल्याच्या चर्चेमुळे भिडे पुलावर नागरिकांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अनेक वाहनचालक पुलावर वाहने उभी करून मगर दिसण्याची वाट पाहत होते. नागरिकांच्या बेशिस्तपणे वाहने उभी करण्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीदेखील झाली होती. नदीपात्रात मगर दिसल्याची फक्त अफवा होती. याबाबत वन विभागाला कोणताही कॉल मिळाला नाही, असे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.