अरूण जेटली यांच्या प्रकृतीविषयी अफवा

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – अर्थमंत्री अरूण जेटली यांची प्रकृती खूपच गंभीर बनली असल्याच्या अफवा काहीं माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. पण त्यात तथ्य नाही असा खुलासा सरकारने आज केला आहे.सरकारचे प्रवक्ते सितांश कर यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून या अफवांचे खंडन केले आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेटली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला पण ते नॉटरिचेबल आढळून आल्याने त्यांच्या प्रकृती विषयीच्या अफवांना उत आला होता. पण जेटली यांच्याही कार्यालाकडून सांगण्यात आले आहे की जेटली हे त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.

जेटली यांना काहीं आजार असल्याने त्यांचा मोदींच्या दुसऱ्या सरकारी मधील मंत्रीमंडळात समावेश होणार नसल्याचेही संकेत आहेत. त्यांना अमेरिका किंवा ब्रिटन मध्ये उपचारासाठी पाठवले जाणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. जेटली यांना गेल्या आठवड्यातच एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आले. भाजप मुख्यालय किंवा एनडीएच्या विजयी बैठकांनाहीं ते उपस्थित राहु शकले नव्हते. 66 वर्षीय जेटली यांची प्रकृती सध्या क्षीण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)