पुणे लॉकडाऊन-5ची नियमावली आज

पुणे – केंद्र सरकारने पाचवा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, त्यामध्ये बरीच शिथिलता दिली आहे. पुणे शहरासाठीची पाचव्या टप्प्याची नियमावली मंगळवारी जाहीर होणार असल्याचे महापालिका आयुक्‍तांनी सोमवारी सांगितले.

करोनाचा रुग्ण सापडलेली केवळ बैठकी घरे, इमारतीतील मजल्याचा ठराविक भाग हा सूक्ष्मबाधित क्षेत्र म्हणून आखणी केली जात आहे. त्यामुळे घरे आणि सोसायट्यांभोवतची शंभर मीटरचा भागात फारशी बंधने असणार नाहीत, असे आयुक्‍तांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातही बहुतांश भागातील व्यवहार सुरळीत सुरू करता येणार आहेत. मंगळवारी जी नियमावली जाहीर होईल त्यामध्ये कोणत्या भागात, कोणत्या गोष्टींना शिथिलता देण्यात येणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.

विशेषत: सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले वगळता नागरिकांना फिरण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील उद्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत. तर, जुन्या बाधित क्षेत्रातील काही दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत केले जाण्याचीही शक्‍यता आहे. त्याचवेळी एखादा परिसर बाधित किंवा सूक्ष्मबाधित क्षेत्र घोषित करण्यापेक्षा रुग्ण सापडलेली नेमकी जागा म्हणजे, घर किंवा त्या इमारतीचा मजल्याबाबत निर्बंध घालण्यात येणार आहे. त्यानुसार नवे सूक्ष्मबाधित क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यावर पोलिसांशी चर्चा करून तेथील सेवा-सुविधांचे धोरण ठरवण्यात येणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

पाचव्या टप्प्यांत नेमक्‍या कोणत्या सवलती देण्यात येऊ शकतात, याविषयीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात रुग्ण असलेल्या आणि नसलेल्या भागांचा अभ्यास झाला असून, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात येतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.