रुखसार परततेय

बॉलीवूडमध्ये आलेले अनेक कलाकार काही काळानंतर या चंदेरी दुनियेपासून लांब जातात. काही वेळा याची कारणं कौटुंबिक असतात, तर बरेचदा त्यांना इथं मनासारखं काम मिळत नाही किंवा कामाचे प्रस्तावच येत नाहीत. मात्र काही जण एखादी संधी मिळाली की लगेचच कमबॅक करुन या ग्लॅमरस विश्‍वात परततात. आत्ता हे सांगण्याचं कारण म्हणजे रुखसार रहमान. नाव ऐकून समजलं नसेल ना?

पण 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या “इंतेहा प्यार की’ नामक एका चित्रपटामध्ये रुखसार ऋषी कपूरची नायिका म्हणून झळकली होती. या चित्रपटाला फारसेयश मिळाले नसले तरी रुखसारने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पण पुढे जाऊन सिनेसृष्टीतल जम बसवण्याऐवजी रुखसारने विवाह करुन या चंदेरी दुनियेला रामराम केला. यानंतर 9 वर्षांनी राम गोपाल वर्माच्या “सरकार’ या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्या म्हणजे सुभाष नांगरेंच्या सुनेच्या भूमिकेत दिसली. सध्या ती चर्चेत आली आहे “द बॉडी’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने बरीच खळबळही उडवून दिली आहे.

शवागृहातून गायब झालेला मृतदेह शोधणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची आणि विवाहबाह्य संबंधांशी मिळतीजुळती कहाणी या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा ऋषी कपूर आणि इमरान हाश्‍मी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. वेदिका आणि जीतू जोसेफ हे या चित्रपटाचे प्रमुख नायक-नायिका असून दोघांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात रुखसारची व्यक्‍तिरेखा नेमकी कोणती हे स्पष्ट झालेले नसले तरी ती ऋषी कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.