“बिग बॉस-14’ची विजेती रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांशी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
रुबिना सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर रुबिना नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत आपल्या लाईफचे अप अँड डाउन शेअर करत असते.
आता अलीकडेच रुबिनाने तिच्या इंस्टाग्रामवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये रुबिनाने हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.फोटोंमध्ये रुबिनाने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक टॉप घातला आहे.
आणि पांढऱ्या पॅन्टसोबत रुबिनाने पांढऱ्या रंगाचा कोटही घातला आहे. या आउटफिटमध्ये रुबिनाने स्मार्ट दिसून येत आहे. चाहत्यांना तिचा हटके अंदाजात चांगलाच आवडला आहे.
रुबिना लवकरच राजपाल यादवसोबत ‘अर्ध’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 10 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.