वाहतूक कार्यालय परिसर नटला आकर्षक हिरवाईने

वाहतूक पोलिसांना मिळणार “फ्रेश’ हवा

– कल्याणी फडके

पुणे – एरवी दिवसभर वाहनांच्या धुरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याबाबत नेहमीच चिंता व्यक्‍त केली जाते. त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना “फ्रेश’ हवेत श्‍वास घेता यावा, यासाठी वाहतूक कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने झाडे लावण्यात आली आहेत. कार्यालय परिसरातील ही हिरवाई आकर्षक दिसत असून, येथील प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे.

पोलीस आयुक्‍तालयातील वाहतूक विभागाचे कार्यालय मागील आठवड्यामध्ये स्थलांतरित करण्यात आले. येरवडा भागांतील शासकीय बंगल्याचे रुपांतर प्रशस्त कार्यालयामध्ये करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नव्याने कार्यान्वित झालेल्या कार्यालयाचे आवार मोठे असल्याने या परिसरामध्ये विविध स्थानिक प्रजातींची रोपे लावण्यात आली आहेत. चिंच, बांबू, पाल्म यासारख्या मोठ्या झाडांसह कर्दळ, जास्वंद, गुलाब, लिली अशी फुलांची आणि शोभेची शेकडो झाडे या परिसरामध्ये लावण्यात आली आहेत. वाहतूक पोलिसांवर असणारा कामाचा ताण आणि वेळ जास्त असते. त्यामुळे चांगल्या वातावरणाची आणि हवेची आवश्‍यकता असते. परिसरामध्ये झाडे लावल्याने वातावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.