परिवहन समितीची माहिती 15 दिवसांत “अपडेट’ करा

जिल्हा सुरक्षा समिती अध्यक्षांची सर्व शाळांना सूचना

पुणे – शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती असणे आणि विशिष्ट कालावधीत त्यांची बैठक घेणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश शाळा याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक शाळेने परिवहन समिती, त्यांच्या झालेल्या बैठका, अध्यक्ष, सदस्यांची नावांबाबतची सविस्तर माहिती भरण्यासाठी पुणे आरटीओने www.schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर शहर, जिल्ह्यातील सर्व शाळांनी 15 दिवसांत माहिती अद्ययावत करण्याचे आदेश जिल्हा सुरक्षितता समितीच्या अध्यक्षांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा सुरक्षितता समितीची पोलीस आयुक्तालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस आयुक्त रविंद्र कदम, प्रभारी वाहतूक पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत आदी उपस्थित होते.

बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक, स्कूलवाहने आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन आणि बस सेवा देणाऱ्या कंत्राटदारांमध्ये करार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल ते जूनदरम्यान 581 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 114 वाहने दोषी आढळली असून 39 वाहनांचे काम थांबविण्यात आले आहे. तडजोड शुल्क म्हणून 4 लाख 6 हजारांची वसुली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)