अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेश स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन मोदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यांसाठी आपण प्रयत्न केले होते. त्यामुळे आपल्याला तुरुंगातही जावं लागल्याचा दावा केला होता. यावरून आता भाजप आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.
मोदींच्या बांगलादेशमधील विधानावर देशभरात वादविवाद सुरू झाले आहेत. त्यातच काँग्रेसच्या एका नेत्यांने थेट मोदींच्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली आहे. गुजरात काँग्रेसचे नेते सरल पटेल यांनी मोदींनी केलेल्या दाव्यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केल्याचं ट्विटरवरून सांगितलं आहे.
Have filed an RTI with PMO seeking more details of the claims made by #PMModi during his visit to #Bangladesh today.
I am very curious to know, under which Indian law was he arrested and which jail was he lodged at during his arrest, aren’t you? 🤔😊#LieLikeModi pic.twitter.com/uvTMRjccq7
— Saral Patel (@SaralPatel) March 26, 2021
मोदींनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केलेल्या दाव्यासंदर्भातील अधिक माहिती मागवणारा आरटीआय अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे केल्याचं पटेल यांनी सांगितलं. या संदर्भात माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. कोणत्या कायद्या अंतर्गत मोदींना अटक करण्यात आली. त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आलं हे मला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल ना?, असा प्रश्नही पटेल यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश स्वातंत्र्याविषयी केलेल्या दाव्यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या विधानावरून मीम्स तयार केले आहेत.