मुंबई – डिसेंबरपासून 24 तास आरटीजीएसद्वारा पैशाची देवाणघेवाण करता येणार आहे. सध्या आठवड्याचे सर्व दिवस आरटीजीएस म्हणजे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत उपलब्ध आहे.
डिसेंबर 2019 पासून एनईएफटी म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर 24 तास उपलब्ध करण्यात आली होती. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेशी एकीकरण होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पैशाची देवाण-घेवाण अहोरात्र करण्यासाठी आरटीजीएस उपलब्ध करण्यात आली आहे. अशी सुविधा काही देशातच उपलब्ध आहे.
एनईएफटीच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत तर आरटीजीएसच्या माध्यमातून मोठ्या रकमा पाठविता येतात. रिझर्व्ह बॅंकेने आरटीजीएस व एनईएफटीवरील शुल्क जुलै 2019 पासून माफ केले आहे.