“आरटीई’च्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 17 डिसेंबरपर्यंत मुदत

राज्यातील 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 477 जागा

 

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी 17 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 477 जागा दर्शवल्या आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 ऑनलाइन अर्ज नोंदविले आहेत. प्रवेशासाठी 1 लाख 36 हजार 254 बालकांची निवड झाली आहे. 70 हजार 101 बालकांचे तात्पुरते प्रवेश झाले. तसेच 84 हजार 482 प्रवेश निश्‍चित झाले आहेत.

नियमित प्रवेशासाठी 1 लाख 926 बालकांची निवड झाली होती. त्यातील 68 हजार 217 प्रवेश निश्‍चित झाले. प्रतीक्षा यादीतील 35 हजार 228 बालकांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यातील 16 हजार 265 बालकांचे प्रवेश निश्‍चित झाले.

रिक्त जागानुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल; परंतु फक्‍त मेसेजवर अवलंबून राहू नये. “आरटीई’ पोर्टलवर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाचा दिनांक पाहावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने दिल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.