आरटीई प्रवेशाची पहिली सोडत आज

पिंपरी – आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. 25 टक्के राखीव जागेतून मिळणाऱ्या या प्रवेशासाठी राज्यस्तरावर आज सोमवार दि. 8 एप्रिल रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश निश्‍चित केला जाणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सोडतीकडे शेकडो पालकांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त झालेल्या अर्जानुसार प्रवेश निश्‍चितीसाठी राज्यस्तरावर सोमवार दि. 8 एप्रिल रोजी लॉटरी पध्दतीने सोडत करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी केली जाणार आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश झाला की नाही, याबाबत पालकांना एसएमएसद्वारे माहीती दिली जाणार आहे. ज्या बालकांचे प्रवेश झाले त्या बालकांच्या पालकांनी वेबसाईटवर जाऊन युजरआयडी व पासवर्ड टाकून प्रवेशपत्र काढायचे आहे. त्यानंतर प्रवेशपत्र व आवश्‍यक ती कागदपत्रे घेऊन पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल करायची आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कागदपत्राची तपासणी केल्यानंतर बालकाचा प्रवेश निश्‍चित होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)