“आरटीई’ प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

प्रवेशासाठीच्या जागा अद्यापही रिक्‍त; पुन्हा 27 सप्टेंबरपर्यंत मुदत

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशासाठीच्या जागा अद्यापही रिक्‍त आहेत. त्या तशाच राहू नये यासाठी पुन्हा 27 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात प्रवेशासाठी 9 हजार 331 शाळांनी नोंदणी केली. यात 1 लाख 15 हजार 460 जागा उपलब्ध झाल्या. यासाठी 2 लाख 91 हजार 368 मुलांचे अर्ज आले.

प्रवेशासाठी 1 लाख 926 मुलांना लॉटरी लागली. यातील 67 हजार 667 प्रवेश निश्‍चित झाले. अद्यापही 47 हजार 793 जागा रिक्‍त आहेत. आधी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली.

मात्र, तरीही बऱ्याचा जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे आणखी एक संधी देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.