डोर्लेवाडी : जगभरात सध्या ओमीक्रोन व्हेरिएन्ट विषाणू चा फैलाव सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे २१ नोव्हेंबर ला झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेवरून सहा दिवसांपूर्वी भारतात परतलेल्या बारामतीच्या खेळाडूची आणि त्याच्या वडिलांची rt-pcr टेस्ट बारामती आरोग्य विभागाकडून करण्यात आली.
यात या दोघांचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग आणि बारामतीच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
विशेष म्हणजे या खेळाडूचे बारामतीत आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले होते यात अनेक नागरिक सहभागी झाले होते यामुळे या दोघांचा रिपोर्ट काय येतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आज त्या दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आरोग्य विभागाकडून त्यांना सात दिवस आसोलेशन मध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे तालुका अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले आहे.