संघाने भाजपाशी युती करावी – अशोक गेहलोत

नवी दिल्ली -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. भाजपप्रणीत केंद्र सरकारवर संघाची मजबूत पकड आहे. संघ ही संविधानेत्तर यंत्रणा म्हणून काम करत आहे. आरएसएसच्या परवानगीशिवाय कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळे आरएसएसने राजकीय पक्ष म्हणून समोर येत भाजपसोबत युती करायला हवी.

आरएसएसला विचारल्याशिवाय भाजपमध्ये कोणी मुख्यमंत्रीही होऊ शकत नाही. आम्ही राजकारणात येणार नाही केवळ सांस्कृतिक गठबंधन करू असे आरएसएसने आधी स्पष्ट केले आहे. आता संघाने स्वत:च्या शब्दावर कायम राहायला हवे असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.