RSS Dasara Vijaya Dashami । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका व संघाचे शतकोत्तर वर्षात पदर्पण, या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवावर यंदा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्राे) दोन माजी अध्यक्षांनी उपस्थित दर्शवली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्राे) माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित आहेत. सरसंघचालकानी त्यांचे स्वागत केले. यासोबतच इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांचीही उपस्थिती आहे. यावेळी राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा गौरव RSS Dasara Vijaya Dashami ।
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा गौरव करत, त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत मोहन भागवत यांनी भाषणाची सुरुवात केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेल्या वैदिक धर्माच्या प्रचारावरदेखील भागवत यांनी भाष्य केले. तसंच बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात केलेल्या कार्याचा उल्लेख भागवत यांनी केला. या सर्वांनी संस्कृतीसाठी काम केले, निस्पृहपणे राष्ट्रहितासाठी काम केल्याचेही भागवत यांनी यावेळी सांगितले. देशाची प्रगती अशीच चालली पाहिजे भारताचे विचार जग स्वीकारत आहे,असेही त्यांनी यावेळी म्हटले.
इस्रायल आणि हमासच्या युद्धावर सरसंघचालकांकडून चिंता व्यक्त RSS Dasara Vijaya Dashami ।
ऑक्टोबर २०२३ पासून गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये इस्रायल आणि हमासच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. २००८ पासून हे गाझा-इस्रायल संघर्षाचे पाचवे युद्ध आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण लष्करी सहभाग आहे. यावर सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. स्वार्थ आणि अहंकारातून हे युद्ध सुरू आहे. याचे जगावर काय परिणाम होतील हे कुणीच सांगू शकत नाही अशी चिंता व्यक्त केली.
हेही वाचा
संघाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा इस्राेच्या दोन माजी अध्यक्षांची उपस्थिती