RSS Dasara Vijaya Dashami । आज नागपुरातील रेशीम बाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे. सकाळी रेशीमबाग मैदानावरील मुख्य सोहळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी संघाच्या स्वयंसेवकांचा रेशीम बाग आणि जवळपासच्या परिसरात पथसंचलन होणार आहे.
संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन हे संगम टॉकीज जवळ स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचं अवलोकन करणार आहेत.
दरम्यान, नागपुरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे रेशीम बाग मैदानावर प्रचंड चिखल झाला आहे. परिणामी येणाऱ्या पाहुण्यांना त्रास होऊ नये, म्हणून कार्यक्रमाच्या वेळात काहीशी कपात करण्यात आली आहे.
सामान्यपणे विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात सुरुवातीला स्वयसेवकांकडून रेशीम बाग मैदानावर शारीरिक कवायतींचे प्रात्यक्षिक केले जातात. मात्र आज मैदानावर चिखल असल्यामुळे फक्त उभे राहून करावयाच्या कवायती केल्या जातील. बसून केल्या जाणाऱ्या कवायती आज रद्द करण्यात आल्या आहे.
हेही वाचा
मनोज जरांगेंचा नारायण गडावर पहिला दसरा मेळावा; 900 एकरच्या मैदानात कसे असणार कार्यक्रमाचे नियोजन?