जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणुकांच्या उत्सवाची तयारी जोरदार होत आहे. मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत सर्वत्र रॅलींची भाऊगर्दी दिसत आहे. 17 व्या लोकसभेसाठी होत असलेल्या या निवडणुका आजवरच्या, जगातील सर्वांत खर्चिक ठरणार आहेत.
सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या मते, या निवडणुकांमध्ये प्रति मतदार होणारा खर्च 560 रुपये म्हणजे 8 डॉलर्स इतका आहे. या निवडणुकीत केवळ सोशल मीडियावर राजकीय पक्षांकडून 50 अब्ज रुपये खर्च होण्याचे अनुमान आहे. 2014 मध्ये हा खर्च 2.5 अब्जच्या दरम्यान होता.