पुणे (प्रतिनिधी) – एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास पैसे काढून देण्याचे बहाण्याने त्याचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदली करुन त्याचे बँक खात्यातून वेळाेवेळी पाच लाख आठ हजार रुपये काढून त्याची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 61 वर्षीय काशिनाथ विश्वनाथ ढावरे यांनी वानवडी पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.
काशिनाथ ढावरे 25 जानेवारी राेजी बँक अाॅफ इंडियाचे एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेले हाेते. त्यावेळी ते एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करुनही पैसे निघत नसल्याने त्यावेळी त्यांचे पाठीमागे उभे असलेल्या एका व्यक्तीने त्यांना मदत करण्याचे बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड घेतले.
त्यानंतर ढावरे यांना पिन क्रमांक टाकण्यास सांगितले व ताे टाकला जात असताना आराेपीने पाहिला. परंतु तरीही पैसे निघत नसल्याने दुसरेच एटीएम कार्ड तक्रारदार यांना दिले गेले. त्यानंतर आराेपीने वेळाेवेळी एकूण पाच लाख आठ हजार रुपये काढून घेत फसवणुक केली आहे.
बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार यांना सदर प्रकार समजला व त्यांनी पाेलीसांकडे याबाबत तक्रार दिली. वानवडी पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहे.