‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . मात्र यावेळी बोल्ड अदांनीमुळे नव्हे तर तर कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे आल्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला इन्स्टाग्रामवर 25 मिलियन फॉलोअर्स ओलांडणारी सर्वात कमी वयातील भारतीय सेलिब्रिटी बनली आणि असे करणारी ती पहिली होती. सध्या तिने केलेल्या मदतीमुळे सोशल मीडियावर तिच्या या मदतीमुळे तिचे फॅन्स कौतुक करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी रूपयांची मदत केली. विशेष म्हणजे एका डान्स मास्टरक्लासच्या माध्यमातून तिने ही रक्कम उभी केली आणि नंतर गरजुंना दान केली.
View this post on Instagram
दरम्यान, उर्वशी रौतेला अखेर अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ आणि इतरांसह पागलपंतीमध्ये दिसली होती. तिचे ‘हेट स्टोरी 4’, ग्रेट ग्रँड मस्ती, सिंग साब द ग्रेट, सनम रे,ह्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांचं मन जिंकले आहे. त्या सोबत तिने बंगाली चित्रपट पोरबशीनी आणि कन्नड चित्रपट मिस्टर ऐरावता मध्ये सुद्धा काम केले आहे. तसेच यावर्षी तिचा तामिळ चित्रपटाचा रिमेक असलेला चित्रपट “वर्जिन भानुप्रिया”ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.