भोर- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून भोर तालुक्यातील 342 दिव्यांग व्यक्तींना सन 2019-20 साठी 41 लाख 4 हजार रुपयांचा निर्वाह भत्ता निधी मंजूर करण्यात आला आहे. यामाध्यमातून प्रत्येक दिव्यांगाला 12 हजार रुपये मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी दिली.
आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे आवाळे यांनी सांगितले. तालुक्यातील अतितीव्र दिव्यांग व्यक्तींसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यादाच निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात उर्वरित दिव्यांगांनाही निधी दिला जाणार असल्याचे आवाळे यांनी सांगितले.