नवी दिल्ली – केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी भरपाई पोटी वर्ष 2020-21 च्या महसूलाची नुकसानभरपाई म्हणून 27 मार्च रोजी 30,000 कोटी रुपये जारी केले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आतापर्यंत, जीएसटी भरपाईपोटी राज्यांना 70,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच याच आर्थिक वर्षात जीएसटी महसूलाची नुकसानभरपाई म्हणून, केंद्र सरकारने 1,10,208 रुपये राज्यांना कर्जस्वरुपात देखील दिले आहेत.
या व्यतिरिक्त, केंद्र सरकारने आयजीएसटी च्या महसूलातील कमतरता भरुन काढण्यासाठी म्हणून 28,000 कोटी रुपये (राज्यांचे 14,000 आणि केंद्राचे 14,000) तात्पुरती व्यवस्था म्हणून, काल वितरीत केले आहेत.
जीएसटी नुकसानभरपाई लक्षात घेऊन केंद्र सरकारने टप्प्याटप्याने दिलेली कर्जाऊ रक्कम आणि आयजीएसटी पोटी दिलेली तात्पुरती रक्कम एकत्र गृहीत धरल्यास, आर्थिक वर्ष 2020-21 साठी राज्यांची सुमारे 63,000 कोटी रुपयांची नुकसानभरपाई थकबाकी केंद्राकडे प्रलंबित आहे.