पोस्ट कार्ड युद्धात केंद्र सरकारचे नुकसान

नवी दिल्ली – प.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेले पोस्ट कार्ड पाठवणे सुरू केले आहे. उत्तर म्हणून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपला जय बांगला लिहिलेले पत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे केंद्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

भाजप ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेले 10 लाख पोस्ट कार्ड पाठवणार आहे. तर प्रत्युत्तरादाखल तृणमूल भाजपला 20 लाख कार्ड पाठवणार आहे. एका पोस्ट कार्ड पोहोचविण्यासाठी प्रत्यक्षात 12 रुपये 15 पैसे पडतात. मात्र अनुदानात सरकार एक पोस्ट कार्ड 50 पैशांना विकते. जर दोनी पक्षांनी एकमेकांना एकूण 30 लाख पोस्ट कार्ड पाठवली तर हिशेबाने केंद्र सरकारला मोठे नुकसान होणार आहे.

भाजप हे जय श्री रामचे कार्ड फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पाठवत आहे. परंतु तृणमूलचे कार्यकर्ते हे जय बांगलाचे कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार लॉकेट चॅटर्जी, अर्जुन सिंह, मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना पाठवत आहेत. जय श्रीराम म्हटल्या प्रकरणी बॅनर्जी यांनी कारवाई केली होती. यावर भाजप बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेले पोस्ट कार्ड पाठवित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.