नवी मुंबईत 1320 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नवी मुंबईत तब्बल 130 किलोग्रॅम हेरॉइन जप्त केले आहे. हे हेरॉइन 260 गोण्यांमध्ये भरलेले होते आणि या सर्व गोण्या एका कंटेनरमध्ये होत्या. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 130 किलोग्रॅम हेरॉइनचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या हेरॉइनच्या साठ्याची किंमत 1320 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत रस्त्याच्या मार्गाने हेरॉइनची तस्करी होत होती पण आता तस्करांनी समुद्र मार्गाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत हेरॉइनचा हा साठा जप्त केला आहे.

दिल्ली पोलिसांनी कारवाई करत हेरॉइनचा साठा जप्त केला आहे तसेच दोन आरोपींना अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी दिल्लीत राहणारा आहे तर दुसरा आरोपी हा कंधारचा (अफगाणिस्तान) रहिवासी आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा मुंबईत आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती अनेक दिवसांपासून होती. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आणि मोठा साठा जप्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.