मुंबई – एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाचे रिलीज झाल्यापासून सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक नामी अवॉर्ड पटकावले आहेत.नुकतेच आर आरला दोन श्रेणींमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचा 80 वा सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे पार पडला. या सोहळ्यात आर आर आरचा बोलबाला पाहायला मिळाला.
2023 च्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकनांची घोषणा 12 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती. यानंतर आता या सोहळ्यामध्ये 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये, RRR च्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला आहे. अवॉर्ड पटकावल्यानंतरचा संपूर्ण टीमचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये अवॉर्ड घोषित होताच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार अवॉर्डचे स्वागत करताना दिसत आहे.
And the GOLDEN GLOBE AWARD FOR BEST ORIGINAL SONG Goes to #NaatuNaatu #GoldenGlobes #GoldenGlobes2023 #RRRMovie
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
बाहुबली फेम एस एस राजामौली यांचा आर आर आर हा सिनेमा साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात बिग बजेट चित्रपट होता. बाहुबली नंतर राजामौली यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत अजय देवगण,राम चरण,एनटीआर अशी तगडी स्टारकास्ट मोठ्या पडद्यावर एकत्र आणली होती. त्यामुळेच सर्वत्र आर आर आरचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ऑस्कर यादीत देखील स्थान पटकावल्यानंतर आता या चित्रपटाने गोल्डन अवॉर्डवर देखील आपली मोहर उमटवली आहे.