आबूधाबी – आयपीएल स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबला प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्यासाठी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याउलट राजस्थानसाठी या सामन्यातील खेळ त्यांची प्रतिष्ठा वाचवू शकतो.
राजस्थान विरूध्द पंजाब यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळातच सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूने लागला आहे. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने क्षेत्ररक्षण स्विकारताना किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
#RR have won the toss and they will bowl first against #KXIP #Dream11IPL pic.twitter.com/AbQzubBNr8
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
दरम्यान, गुणतालिकेत पंजाबचा संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानावर असून प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्यासाठी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे राजस्थान राॅयल्सचा संघ 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स या संघाने स्पर्धेत प्ले-ऑफ गटात स्थान मिळवले आहे.