नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय-ए मशिदींमधून लाऊडस्पीकर काढण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीला समर्थन देत नाही. या मुद्द्यावर राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपही पाठिंबा देत नसल्याचा दावाही आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आठवले म्हणाले, जर मनसेला लाऊडस्पीकर वापरायचे असतील तर ते वापरू शकतात, पण मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीला आमचा विरोध आहे. अशा मागणीला बाळासाहेब ठाकरेंचाही विरोध होता. मला वाटते धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंदीच्या आवाहनाला भाजप पाठिंबा देत नाही. अशी भूमिका भाजपने कधीच घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास’वर विश्वास असून भाजप अशी भूमिका घेण्याची शक्यता नाही. हा राज ठाकरेंचा अजेंडा आहे, असे आठवले म्हणाले.
दरम्यान, नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. त्यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंत ते काढून टाकण्यास सांगितले आहे, असे न झाल्यास त्यांचा पक्ष (मनसे) मशिदीबाहेर लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा वाजवेल, असा इशारा राज यांनी दिला आहे.