चेन्नई सुपर किंग्जचे ‘प्ले ऑफ’वर लक्ष्य

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु Vs चेन्नई सुपर किंग्ज

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

बंगळुरू – रॉयल चॅलेंजर बंगळुरूसोबत रविवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवित चेन्नई सुपर किंग्जचे लक्ष्य “प्ले ऑफ’ फेरीत प्रवेश करणाऱ्यावर असणार आहे. गतविजेत्या चेन्नईला मागील लढतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत सनरायजर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. बंगळुरुविरुद्ध विजय मिळविल्यास 16 गुणांसह चेन्नई अंतिम चार संघात आपले स्थान निश्‍चित करेल.

आयपीएलच्या या सत्रात प्रारंभीपासूनच दोन्ही संघाची कामगिरी परस्पर विरोधी राहिली आहे. चेन्नईने पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रदर्शन निराशाजनक ठरले. पण शुक्रवारी झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्याने बंगळुरू संघाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांच्या तडाखेबाज फलंदाजीनंतरही बंगळुरूला विजय मिळवित आला. बंगळुरूने नऊ सामन्यात दोन विजय मिळविल्याने प्लेऑफबाबत त्यांच्या आशा कायम आहेत.

कोलकाताविरुद्ध दिग्गज एबी डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीत कर्णधार विराट कोहली याने फलंदाजीचे सूत्रे आपल्या हाती घेत शतकीय खेळी करून मोठी धावसंख्या उभारली होती. तसेच घरच्या मैदानावर होणाऱ्या चेन्नईसोबतच्या सामन्यात डिव्हिलयर्सची वापसी होण्याची शक्‍यता असल्याने संघाला विजयाची आशा आहे. याशिवाय संघात डेल स्टेनही दाखल झाल्याने गोलंदाजीही भक्‍कम झाली आहे.

दुसरीकडे 40 वर्षिय इम्रान ताहिर चेन्नईचा स्टार गोलंदाज ठरत आहे. त्याने कर्णधाराच्या योजनांना मैदानावर यशस्वी ठरवित आतापर्यत 13 विकेट घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडूनही दमदार खेळीची अपेक्षा असून त्याने आठ सामन्यात दोन अर्धशतक झळकावित 230 धावा केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.