चेन्नई सुपरकिंग्ज समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे लोटांगण…

चेन्नई – आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या झंजावातासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लोटांगण घातले आहे. इम्रान ताहीर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा यांच्या फिरकीसमोर बंगळुरुच्या संघाने गुडघे टेकल्याचे चित्र आज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम वर पाहायला मिळाले. आयपीएलमधील सुरुवातीच्याच सामन्यात बंगळुरुचा संघ अवघ्या 70 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कोणत्याही खेळाडूला विकेट वर टिकू दिले नाही. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा चेन्नईच्या ८.५ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात ३६ धावा झालेल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी चेन्नईच्या संघाला ६७ बॉल मध्ये ३५ धावांची आवश्यकता आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×