वुमन्स प्रीमियर लीग 2025 ला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज असल्याने आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातच्या संघाने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांनी 20 षटकात पाच गडी गमवून 201 धावा केल्या आणि आरसीबीला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं.
यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरुवात दमदार झाली. मात्र काही वेळाने संघाची कर्णधार स्मृती मंधाना आणि डॅनियल बाद झाल्या. यानंतर एलिसा पेरी आणि रिचा घोष यांनी संघाचा मोर्चा सांभाळला. पेरीने ५७ धावा, रिचाने नाबाद ६४ धावा तसेच कनिका अहुजा हिने नाबाद ३० धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
गुजरात जायंट्सकडून एशले गार्डनरने सर्वाधिक नाबाद 79 धावांची खेळी केली. तिने 37 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यानंतर बेथ मूनीने 42 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी गौतम.